‘सोमाणी’ विद्यालयाच्या श्रेयशची राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड
लातूर : येथील श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचा इयत्ता दहावी मधील विद्यार्थी श्रेयश श्रीकांत शेळके याची राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पुण्याच्या बालेवाडीत नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या वयोगटातून , ७३ किलो वजनी गेटमधून श्रेयशने प्रथम क्रमांक पटकावला होता. या यशामुळे श्रेयशची मणिपूरचे राजधानी इंफाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. श्रेयश शेळके याने मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. चेतन सारडा, सचिव कमलकिशोर अग्रवाल, कोषाध्यक्ष जयेश बजाज, शालेय समितीचे अध्यक्ष अतुल देऊळगावकर, मुख्याध्यापक रमाकांत स्वामी, पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी, सुनीता जाधव, राहुल पांचाळ यांच्यासह सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. श्रेयशला क्रीडा शिक्षक रुपाली कांबळे, गोरख राठोड, माणिक हाके यांचे मार्गदर्शन लाभले.
