महिला सक्षमीकरणाकडे आणखी एक पाऊल; विलासराव देशमुख फाउंडेशनतर्फे लातूरमध्ये मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्राचा (क्र. १३) शुभारंभ
लातूर,(१२) प्रतिनिधी : विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने लातूर शहरातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमांतर्गत,
प्रभाग क्रमांक १४ येथील तुळजाभवानी नगर, जुना औसा रोड येथे मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र क्र. १३ चा शुभारंभ करण्यात आला आहे. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने आणि
ट्वेंटीवन ॲग्रीच्या संचालिका सौ. अदिती अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून विलासराव देशमुख फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी हे नवीन केंद्र सुरू करण्यात आले आहे. फाउंडेशन कडून महिलांना मोफत प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम करण्यात येत आहे.
८४ महिलांचा सहभाग
या प्रशिक्षण केंद्रामध्ये एकूण ८४ महिलांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या ठीकाणी महिलांना शिलाईकामातील विविध पद्धती आणि तंत्रांचे सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. या केंद्राचा शुभारंभ विलास को. ऑप.बँक लातूरचे चेअरमन ॲड. किरण जाधव यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी संस्थेच्या समन्वयक संगीता मोळवणे, अविनाश देशमुख, विक्रम बिराजदार, चंद्रज्योती बिराजदार, उर्मिला मुगळे, ट्रेनर क्रांती उफाडे ठाकूर, जगताप आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता कुलकर्णी यांनी केले, तर संगीता कदम,
पूजा गोरे, लक्ष्मी काटकर, अलका राजेगावे या महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे सोशल प्लॅनर गजानन बोयणे आणि प्रभागातील मोठ्या संख्येने महिला या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होत्या.
