मांग समाजाची,सामाजिक,धार्मिक व राजकीय सद्यस्थिती !
मांग समाजाच्या तरुणांची सद्यस्थिती समाजाच्या पाहिले असता अण्णाभाऊ साठेंच्या “इरनं गाढव खाल्लं” या कथेची खूप आठवण येते. अण्णाभाऊ साठे यांची ही कथा नुसती कथा नसून मांग समाजातील आजच्या तरुणांच्या शिक्षण क्षेत्रातील नाकर्तेपणाला उजाघर करणारीच वाटते. खरतर
अण्णाभाऊ साठे यांच्या या “इरेनं गाढव खाल्ले” या कथेतील दत्तू का आहे. आपल्या अशिक्षितपणामुळे आणि अंधश्रद्धाळू कोणामुळे किती मोठ्या नुकसानी जातो आणि त्याचा अहंकार कसा नष्ट होतो ही गोष्ट खरंच आपण प्रत्येकाने वाचली पाहिजे. खरंच आपल्या लक्षात येईल की, आज सद्यस्थितीला मातंग-मांग समाजाची सामाजिक धार्मिक व राजकीय सद्यस्थिती काय आहे आणि कशामुळे आहे याची उत्तरे त्यांना स्वतः सापडतील.
संवैधानिक भारताच्या युगापासून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील शक्तिशाली असलेल्या महार व मांग जातीला सातत्याने विभाजित करण्याचा मोठा प्रयत्न होत आहे. या प्रयत्नातूनच सातत्याने महाराष्ट्रातील बौद्धांना अर्थात पूर्वाश्रमीच्या महार आणि मांगाचे शोषण आणि दमन करण्यासाठी महाराष्ट्रातील ब्राह्मण आणि ब्राह्मण्यनीती सातत्याने काम करते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मांग समाजातील पुढारी व महार समाजातील पुढारी मनुवादी व गांधीवाद्यांच्या षडयंत्राला सातत्याने बळी पडतात.
लोकशाहीर साहित्यरत्न
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या प्रत्येक कथा कादंबरी आणि छक्कड मधून पुरोगामी महाराष्ट्रातील ब्राह्मणनीतीला आणि ब्राह्मण्यग्रस्त व्यवस्थेला सातत्याने उघडे पाडण्याचे काम केले, तिच्यावर कडे प्रहार केले.परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वानानंतर समाजामध्ये स्वतःला शिक्षित आणि उच्चशिक्षित समजणाऱ्या दोन्ही समाजातील पुढार्यांनी आपण शोषित असल्याचे भान विसरून प्रस्थापित व्यवस्थेच्या चरणावरती लोटांगण घेत आपापसात फूट पाडणाऱ्या दरीला मोठे करण्याचे काम सातत्याने केले.
आज संवैधानिक भारतातील जवळपास 70 वर्षांमध्ये शोषित आणि पीडित म्हणून जगत असताना,अशिक्षित असलेल्या अण्णाभाऊंनी अवघ्या दीड दिवसाच्या शाळेमधून या देशातील स्वातंत्र्य दिनाला “ऐ आझादी झूठी है, देश की जनता भुकी है”, असे म्हणत विरोध करण्याचे मोठे क्रांतीकारी काम केले. परंतु अण्णाभाऊ साठे यांनी भारत स्वातंत्र्य दिनास का विरोध केला, याचे मात्र आकलन अद्याप ही मांग समाजातील पुढाऱ्यांना नेत्यांना शिक्षितांना झाले नाही. ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.
अण्णाभाऊंच्या कथा आणि कादंबऱ्यातील प्रत्येक नायक आणि नायिका स्वसन्मान, स्वाभिमान जपतात आणि अन्यायाविरुद्ध बंड करून उठण्याची हिंमत ठेवतात. परंतु आज शिक्षित आणि उच्च शिक्षित असलेल्या मांग पुढार्यांनी स्वतः आणि स्वतःच्या बायका लेकराच्या पोटाची खळगी भरण्यासाठी स्वसन्मान स्वाभिमानच घाण ठेवला आहे. ही खूप मोठी शोकांतिका आहे.
जातीय स्तरावर तमाम अस्पृश्य आणि मागासवर्गीय यांची आर्थिक सामाजिक धार्मिक राजकीय पिळवणूक करणाऱ्या धर्म मार्तंडांना आपल्या अनेक कथांच्या नायक आणि नायकाच्या माध्यमातून धडा शिकवणारे अण्णाभाऊ हे समाजाला स्वसन्मान आणि स्वाभिमान जपण्याची भाषा शिकवतात परंतु आज मात्र शिकल्या सवरलेल्या मांगानी आपला आदर्श पुरुषच बदलला आहे. हे मोठे विदारक सत्य आहे. खरं तर अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये बंड करून उठण्याची ताकद समाजात तेव्हाच येते जेव्हा त्यांचा आदर्श पुरुष किंवा आदर्श नायक हा त्यांना स्वसन्मान आणि स्वाभिमानाची भाषा शिकवतो. ही गोष्ट आजचे मांग तरुण विसरून जात आहेत. असे मोठ्या खेदाने सांगावेसे वाटते.
वास्तविक पाहता आणि त्यामुळेच आज संवैधानिक भारताच्या 75 वर्षांमध्ये सुद्धा गावकुसामध्ये आणि शहरांमध्ये मातंग तरुणांना जातीयवाद्याकडून मूत्र पाजण्याची वेळ आलेली आहे. आजही आपणास जातीय स्तरावरून मारहाण करण्यात येते. अपमानित करण्यात येते. आपल्या आया बहिणीवर पाशवी बलात्कार होतात तरुणांना भर चौकात मूत्रपाजून मारले जाते. खरं तर यास आपणच जबाबदार आहोत हे मात्र आपण लक्षात घेत नाहीत.
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या उभ्या ह्यातीमध्ये आपल्या साहित्याच्या आणि लेखणीच्या माध्यमातून इथल्या भांडवल शहा आणि उद्योगपती पूजा मध्ये जाऊन अस्पृश्यांच्या हिताचे संरक्षण कसे करता येईल यासाठी आपली लेखणी उभं आयुष्य झिजविली. परंतु आज जानवे आणि सोवळ्याच्या नादामध्ये मांग पुढाऱ्यांनी आणि शिक्षकांनी मानसिक, शारीरिक, बौद्धिक गुलामीची कास धरली आहे. हे बाप कोणीही ना करू शकत नाही.
माटे मास्तराच्या इशाऱ्यावर चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला विरोध करणाऱ्या सगट मास्तरापासून सुरू झालेला प्रवास आजच्या बहुतांश मांग पुढाऱ्यांच्या घसरलेल्या आणि ढासळलेल्या नीतीमत्तेचे प्रदर्शन करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांचे पाय पकडून करतात. म्हणजेच याच पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हजारो वर्षापासून तमाम अस्पृश्यांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाण्यासाठी संघर्ष करत असताना या परिवर्तनाच्या आणि ऐतिहासिक लढ्याला विरोध करण्याची परंपरा आज ही जोपासली जात आहे. अशा परिवर्तनाला करणाऱ्या समाजाच्या सद्यस्थिती आणि वास्तवाबद्दल काय बोलावे हे समजत नाही? ज्यांनी मानसिक आणि बौद्धिक गुलामगिरीला बिंबीच्या देठापासून स्वीकारलेले आहे अशा समाजाची सद्यस्थिती निश्चितच कौतुकास्पद असणार नाही. ही बाब आता मांग समाजाच्या नवीन पिढीतील तरुणांनी समजून घ्यावी आणि भविष्याच्या वेध घेत आजच योग्य ती पावले उचलण्यास सुरुवात केली पाहिजे. तरच आपणास अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील विचारातील जातीय समाज व्यवस्थेत प्रतीचा विद्रोह लक्षात येईल.
– विजय अशोक बनसोडे
धाराशिव
मो. 8600210090
